सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षा दलाच्या गोरक्षकांनी ३१ गोवंशियांचे प्राण वाचवले
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर काय उपाययोजना करणार आहे ?
पुणे : सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षा दलाच्या गोरक्षकांना कोंढवा येथे कौसरबाग मशिदीच्या आवारात झोपडपट्टी भागात भरपूर मोठ्या प्रमाणावर कत्तल करून पुण्यातील नामांकित उपाहारगृहे, मागासवर्गीयांची वस्ती, बहुसंख्य मुस्लिम भाग येथे गोमांस पाठवले जात असल्याचे कळले. त्यावर गोरक्षक निखिल दरेकर, ऋषिकेश कामथे, किरण दर्बी आणि राहूल कदम यांनी घटनास्थळाची पहाणी करून मध्यरात्री साडेतीन वाजता पोलिसांच्या साहाय्याने कारवाई केली. घटनास्थळी पोचताच चार खाटीक धारदार शस्त्रांनी गोमांसाचे तुकडे करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चारही कसायांना कह्यात घेतले.
घटनास्थळी ३ टन गोमांस जप्त करण्यात आले. तसेच ३१ जिवंत गोवंशियांना वाचवण्यात आले. सर्व जनावरे गोशाळेत सुखरूप सोडण्यात आली. या संदर्भात गोतस्कर, गोठामालक, खाटीक यांच्यावर गुन्हे नोंद झाले आहेत. या कारवाईनंतर गोरक्षकांनी सर्व पोलीस अधीक्षकांचे आभार मानले आणि भगवान शिवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात