राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तृतीय स्थानी
हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरील आक्रमणे कायमची रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
मुंबई : गेल्या काही दिवसांत आंध्रप्रदेशातील मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विजयवाडा येथील श्री कनकदुर्गा मंदिरातील ३ सिंहांच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्या, तसेच गोदावरी जिल्ह्यातील अंतर्वेदी येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील प्राचीन रथ जाळण्यात आला. याखेरीज कृष्णा जिल्ह्यातील १२ व्या शतकातील प्राचीन शिवमंदिरामधील नंदीची मूर्ती तोडण्यात आली. अशा घटनांमुळे संतप्त झालेल्या धर्मप्रेमींनी याच्या विरोधासाठी २३ सप्टेंबर या दिवशी सकाळी ‘#AndhraTemplesInDanger’ हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ केला होता. काही वेळातच तो राष्ट्रीय स्तरावर तिसर्या स्थानी पोचला. यावर दुपारपर्यंत ५० सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आले.
१. या ट्रेंडमध्ये अनेकांनी राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारला विरोध केला. ‘रेड्डी यांचे सरकार आल्यापासून मंदिरांवरील आघातांमध्ये वाढ झाली असून सरकार ते रोखण्यास अपयशी ठरले आहे’, असे म्हटले.
२. एका ट्वीटमध्ये म्हटले की, मंदिरांच्या सरकारीकरणामुळे अशा घटना घडत आहेत. यामुळे मंदिरांवर आक्रमण, चोर्या आणि भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. यासाठी मंदिर सरकारमुक्त करून त्यांना भक्तांच्या हातात सोपवले पाहिजे.
३. अन्य एकाने म्हटले की, श्रीशैलम् येथे उघडपणे ख्रिस्ती मिशनरी मंदिराबाहेर बायबलचे वितरण करत आहेत. आंध्रप्रदेशमध्ये धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्याचे ख्रिस्तीकरण होत आहे. हिंदूंनी संघटित होऊन यास विरोध केला पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात