बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !
ढाका (बांगलादेश) : ब्राह्मणबेरियातील मुचीपारा गावात धर्मांधांनी हिंदु कुटुंबावर केलेल्या आक्रमणात महिला आणि किशोरवयीन मुले यांसह ७ जण घायाळ झाले. आक्रमणकर्ते अवामी लीगचे स्थानिक सरचिटणीस सलीम उदिन यांचे कार्यकर्ते असून त्यांनी २० वर्षीय रिपन दास यांच्यावर ते शेजारील गावातील एका धार्मिक कार्यक्रमातून घरी परत येत असतांना हे आक्रमण केले.
१. राहत, सुमन आणि रासेल यांनी रिपन यांच्यावर मादक द्रव्ये बाळगल्याचा खोटा आरोप केला आणि जेव्हा त्यांनी हे आरोप फेटाळले, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. रिपन यांचे कुटुंब जेव्हा त्यांची सुटका करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यावरही आक्रमण करण्यात आले. यात ७ जण घायाळ झाले.
२. ‘बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकता परिषदे’चे सह सरचिटणीस सुजान दत्ता यांनी सांगितले की, धर्मांधांकडून रिपन दास यांची भूमी कह्यात घेण्यासाठी ५ हिंदु कुटुंबांना नियमितपणे त्रास दिला जात आहे. त्यामुळे ही कुटुंबे दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. त्यांच्यावर कधीही आक्रमण होऊ शकते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात