Menu Close

पाकमध्ये १७१ हिंदूंचे सामूहिक धर्मांतर !

पाकमधील हिंदूंचे विविध मार्गांनी अस्तित्व नष्ट करण्यात येत असतांना जगभरातील हिंदू निष्क्रीय आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !

नवी देहली : पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी पाकच्या  सिंध प्रांतातील अहसान-उल्-तालीम या मदरशाने कराची शहरातील एका सामूहिक धर्मांतराच्या कार्यक्रमात १७१ हिंदूंचे धर्मांतर केले, अशी माहिती दिली. यात महिला, पुरुष आणि मुले यांचा समावेश आहे. ‘इस्लामिक आयडियोलॉजी काऊन्सिल’चे माजी सदस्य नूर अहमद तशर यांनी यात सहभाग घेतला. धर्मांतर करण्यात आलेले सर्व हिंदू भील समाजातील असून त्यांना विविध प्रकारचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले. यापूर्वी जून मासामध्ये सिंध प्रांतातील बाडिन जिल्ह्यामध्ये १०० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले होते. ऑगस्ट मासामध्ये २०४ हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *