श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते करण परब यांची अभिनंदनीय कृती !
मुंबई : काही दिवसांपूर्वी येथील अरेना अॅनिमेशन इन्स्टिट्यूटच्या बाहेरील भिंतीवर क्राईम पॉल्युशन ही संकल्पना घेऊन भित्तीचित्र काढले होते. त्यात त्यांनी विविध माध्यमांतून प्रदूषण कसे होते हे दाखवले होते. त्या चित्रातील एका भागात पाण्याचे प्रदूषण हे गणेशमूर्तींच्या विसर्जनाने होते, असे दाखवण्यात आले होते.
हे गणेशाचे होणारे विडंबन श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. करण परब यांनी कामावर जातांना पाहिले आणि त्याने त्वरित त्याच दिवशी अरेना अॅनिमेशन इनस्टिट्यूटमध्ये जाऊन हे तुम्ही काढलेले भित्तीचित्र चुकीचे आहे. श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा आणि पाण्याच्या प्रदूषणाचा काही संबंध नाही, असे सांगितले. तेव्हा तेथील कर्मचार्यांनी आमचे जे प्रमुख आहेत, ते आज उपस्थित नाहीत. त्यामुळे तुम्ही २ दिवसांनी या, असे त्याला सांगितले.
श्री. करण २ दिवसांनी पुन्हा अरेना अॅनिमेशन इन्स्टिट्यूटमध्ये गेले आणि त्या वेळी त्याने अरेना अॅनिमेशन इन्स्टिट्यूटच्या त्या शाखेच्या प्रमुख श्रीमती सुब्रमण्यम् यांच्याशी भेट घेतली आणि काढलेल्या भित्तीचित्रातून श्री गणेशाचे कशा प्रकारे विडंबन होत आहे. तसेच वर्षभर कारखान्यातून सोडण्यात येणार्या पाण्यामुळे प्रदूषण अधिक प्रमाणात होते; श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे नाही, याविषयी प्रबोधन केले. श्रीमती सुब्रमण्यम् यांना त्यांच्याकडून झालेली चूक लक्षात आली आणि आम्ही २ दिवसांत ते श्री गणेशमूर्ती विसर्जनाचे चित्र काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. श्री. करण याने २ दिवसांनी पुन्हा जाऊन पाहिले, तेव्हा त्या भित्तीचित्रातील श्री गणेशमूर्ती विसर्जनाचे चित्र खोडून टाकले होते. (सतर्कतेने आणि तत्परतेने कृती केल्याविषयी श्री. करण परब यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात