‘डिक्लेरशन ऑफ फेथ अँड बिलीफ’ या नियमानुसार सर्वांकडून श्री बालाजीवर श्रद्धा असल्याचे लिहून घेणे शक्य नसल्याचे देवस्थानम्’च्या अध्यक्षांचे मत
असे असेल, तर या नियमाला काय अर्थ रहातो ? असे किती संख्येने अन्य धर्मीय मंदिरात येतात ? आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे सरकार असल्याने आणि वाय.व्ही. सुब्बा रेड्डी हे त्यांचे काका असल्याने त्यांच्याकडून जाणीवपूर्वक असे लिहून घेण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
भाग्यनगर : प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात अहिंदूंना प्रवेशासाठी असलेल्या नियमांत कोणताही पालट करण्यात आलेला नाही, असा खुलासा या मंदिराचे संचालन करणार्या ‘तिरुमला तिरुपति देवस्थानम्’ने नुकताच केला.
१. ‘तिरुमला तिरुपति देवस्थानम्’चे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी ‘जगभरातून सहस्रो भाविक तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी येतात. या भाविकांमध्ये अन्य धर्मीयही असतात. त्यामुळे प्रत्येकाचा ‘डिक्लेरशन ऑफ फेथ अँड बिलीफ’ (तिरुपती मंदिरात अहिंदूंना लिखित स्वरूपात त्यांचा धर्म नमूद करून त्यांची श्री बालाजीवर श्रद्धा असल्याचे लिहून देण्याचा नियम आहे.) लिहून घेणे शक्य नाही’, असे विधान पत्रकारांशी बोलतांना केले होते. त्यावरून अहिंदूंना प्रवेशासाठी असलेल्या नियमांत पालट केला जाणार असल्याची जोरदार चर्चा चालू होती. त्यावर रेड्डी यांनी वरील खुलासा केला.
२. रेड्डी पुढे म्हणाले की, ‘मी वरील विधान केले असले, तरी ‘डिक्लेरशन ऑफ फेथ अँड बिलीफ’च्या नियमांत पालट करण्याचा मी उल्लेख केलेला नाही. त्यामुळे हे आरोप धादांत खोटे आहेत.’ तिरुपती मंदिरात वार्षिक ब्रह्मोत्सवास २० सप्टेंबरपासून आरंभ झाला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात