Menu Close

विवाहानंतर धर्मांतर करण्यास नकार दिल्याने एजाज अहमद याच्याकडून हिंदु पत्नीचा शिरच्छेद

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथील संतापजनक घटना

  • अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी भरचौकात होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच लव्ह जिहाद्यांना आळा बसेल ! या घटनेविषयी पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, डावे, धर्मांध कधी एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • मतांच्या राजकारणामुळे आतापर्यंतची सरकारे लव्ह जिहादचे प्रकार रोखू शकलेली नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. या घटना रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
  • अशा घटना पाहून हिंदु तरुणींनी धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये, हीच अपेक्षा !

सोनभद्र (उत्तरप्रदेश) : विवाहानंतर धर्मांतर करण्यास नकार दिल्याने एजाज अहमद नावाच्या नराधमाने हिंदु पत्नी प्रिया सोनी (वय २३ वर्षे) हिचा शिरच्छेद केला. चोपन पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील प्रीतनगर येथील जंगलात हा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी एजाज अहमद आणि त्याचा साथीदार शोएब अख्तर या दोघांना अटक केली आहे.

या घटनेविषयी माहिती देतांना पोलीस अधीक्षक एस्.पी. आशिष श्रीवास्तव म्हणाले की,

१. ‘२१ सप्टेंबर या दिवशी प्रीतनगर येथील जगंलात शिर नसलेला मृतदेह आढळून आला. आम्ही सामाजिक माध्यमांच्या साहाय्याने या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २२ सप्टेंबर या दिवशी प्रिया सोनी यांच्या वडिलांनी कपडे आणि बूट यांवरून तो मृतदेह त्यांच्या मुलीचा, म्हणजेच प्रिया सोनी यांचा असल्याचे असल्याचे ओळखले.

२. दीड मासांपूर्वी प्रिया यांनी तिच्या कुटुंबियांचा विरोध डावलून तिच्या शेजारी रहाणार्‍या एजाज अहमद याच्याशी ७ जुलै या दिवशी विवाह (कोर्ट मॅरेज) केला.

३. प्रिया यांनी धर्मांतर केल्याविना त्यांना घरात घेण्यास एजाज याचे कुटुंबीय सिद्ध नव्हते. त्यामुळे विवाह झाल्यानंतर एजाज याने प्रिया यांना घरी न नेता ओबरा येथील एका ‘लॉज’वर नेले. तेथे तो प्रिया यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी सातत्याने दबाव आणत होता. त्यास प्रिया यांनी ठामपणे नकार दिला. यामुळे चिडलेल्या एजाज याने त्याचा साथीदार शोएब अख्तर याच्या साहाय्याने प्रिया यांना प्रीतनगर येथील जंगलात नेऊन त्यांचा शिरच्छेद केला. त्यानंतर या दोघांनी प्रिया यांचे धड झाडाझुडपांत फेकून दिले आणि चिरलेले शिर चोपन येथे आणून ते लपवून ठेवले.

४. या घटनेनंतर पोलिसांनी तपास पथके स्थापन करून २४ सप्टेंबरला एजाज अहमद आणि शोएब अख्तर या दोघांना बग्घा नाला पूल येथून अटक केली. त्यांच्याकडून प्रिया सोनी यांचा भ्रमणभाष, चाकू, लोखंडी रॉड आणि चारचाकी गाडी हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्यां’तर्गत (‘रासुकां’तर्गत) कारवाई करण्यात येणार आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *