‘स्वस्तिक’ नाव कायम ठेवणार्या ग्रामस्थांचे अभिनंदन !
वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ब्लॅक ब्रुक या क्षेत्रात ‘स्वस्तिक’ नावाचे गाव आहे. या गावाला गेल्या शतकभरापासून याच नावाने ओळखले जाते; मात्र ‘स्वस्तिक’चा संबंध हिटलरच्या नाझी शासनाशी लावत याला विरोध करण्यात येत आहे; मात्र गावाच्या परिषदेने सर्वसंमतीने गावाचे नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
१. विरोधकांचे म्हणणे आहे की, गावाचे नाव स्वस्तिक असणे, म्हणजे दुसर्या महायुद्धात हुतात्मा झालेल्यांचा अपमान करणे होय. विशेष म्हणजे या गावापासून जवळच दुसर्या महायुद्धात हुतात्मा झालेल्यांचे स्मारकस्थळ आहे.
२. ब्लॅक ब्रूकचे पर्यवेक्षक जॉन डगलस यांनी म्हटले की, ज्यांना आमच्या समुदायाच्या इतिहासाविषयी ठाऊक नाही, अशा लोकांना गावाचे नाव ऐकून अपमानजनक वाटले. त्याविषयी आम्हाला वाईट वाटले. ‘स्वस्तिक’ हे नाव आमच्या पूर्वजांनी ठेवलेले आहे. अनेक लोक ‘स्वस्तिक’ हे नाव हिटलर आणि त्यांच्या नाझी पक्षाशी जोडून पहातात; मात्र या गावाचा इतिहास त्यापेक्षा अधिक जुना आहे. या गावाचे नाव संस्कृत भाषेतील शब्द ‘स्वस्तिक’ नावावरून ठेवण्यात आले आहे. ज्याचा अर्थ ‘कल्याण’ असा होतो. या भागात अनेक लोक आहेत ज्यांनी दुसर्या महायुद्धात भाग घेतला होता; मात्र त्यांनीही नाव पालटण्यास विरोध केला आहे; कारण हिटलरने स्वस्तिकचा अर्थ दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात