Menu Close

देहली दंगल आणि सीएएविरोधी आंदोलन यांमागे आय.एस्.आय.चा हात ! – देहली पोलिसांची माहिती

जर असे पुरावे भारताला मिळत असतील, तर भारत पाकवर कारवाई का करत नाही ? पाक आतंकवादी आणि जिहादी यांच्या माध्यमांतून भारतात कारवाया करतो आणि भारत पुरावे देण्याच्या पलीकडे काहीही करत नाही. यापुढे जाऊन अशा कारवाया करण्यास पाक अस्तित्वातच रहाणार नाही, असे का करत नाही ?

नवी देहली : देहली दंगली, तसेच सीएए आणि एन्.आर्.सी. यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांमागे पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा हात असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणातून समोर आले आहे. आय.एस्.आय.च्या सांगण्यावरून खलिस्तान समर्थकही या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. आरोपी अतर खान याचा कबुलीजबाब यात नोंदवण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, या आंदोलनांमध्ये सहभागी होणार्‍या महिलांना प्रतिदिन पैसे देण्यात येत होते. पैसे वाटण्याचे दायित्व काही मुलींना देण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *