हे आक्रमण रोखण्यासाठी विहिंपने केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्ये यांना कायदा करण्यासाठी अन् धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यासाठी सांगितले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
नवी देहली : ‘लव्ह जिहाद’ हे लोकसंख्येवरील एक सुनियोजित आक्रमण आहे. पोलीस, सरकार आणि समाज या तिघांनी मिळून सतर्कतेने समयोचित कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार यांनी ‘हिंदु विश्व’ या नियतकालिकाच्या ‘लव्ह जिहाद’ विशेषांकाच्या प्रकाशनाच्या वेळी केले. या विशेषांकामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचाही लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अधिवक्ता आलोक कुमार पुढे म्हणाले की,
१. ‘लव्ह जिहाद’ हे एक असे षड्यंत्र आहे जे काही लोकांद्वारे जाणीवपूर्वक पैसे, साधन आणि धार्मिक अंधविश्वास यांद्वारे चालवले जात आहे. ते रोखण्याची नितांत आवश्यकता आहे. या विशेषांकामध्ये लव्ह जिहादच्या १४७ घटनांची सूची आणि तथ्ये दिली आहेत. ते समाजाचे डोळे उघडणारे आहेत.
२. वर्ष २०१२ मध्ये केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन् यांनी म्हटले होते की, राज्यात गेल्या ३ वर्षांत २ सहस्र ६६७ हिंदु तरुणींनी इस्लामचा स्वीकार केला, तर त्यांतील ७९ तरुणी पुन्हा हिंदु धर्मांत परतल्या. यांत २ ख्रिस्ती तरुणीही होत्या.
३. लव्ह जिहादी मुसलमान तरुण असा विचार करतो की, हिंदु मुलींना विश्वासघाताने, टिळा लावून, हातात दोरा बांधून स्वतःला हिंदु असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि विवाह करून धर्मांतर करता येऊ शकते. यासाठी त्याला त्याच्या धर्मियांकडून साहाय्य मिळते. जेव्हा विवाहानंतर तरुणीला लक्षात येते की, तो मुसलमान आहे, तेव्हा त्या तरुणीची स्थिती काय होते, हे अनेक उदाहरणांवरून समोर आलेले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात