श्रीकृष्णजन्मभूमीसाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्याचे प्रकरण
श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची आहे. त्यासाठी हिंदू पोळी भाजतील किंवा अन्य काही करतील, हा त्यांचा प्रश्न आहे. धर्मांधांनी त्याविषयी बोलण्यापेक्षा ही भूमी हिंदूंना नम्रपणे परत द्यावी !
अयोध्या (उत्तरप्रदेश) : हिंदु आणि मुसलमान असे राजकारण करणारे मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या वादाला फोडणी देत आहेत. काही लोक त्याद्वारे स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हा वाद चालू करू इच्छित आहेत. हिंदु आणि मुसलमान असे राजकारण झाले नाही, तर भारत जगामध्ये वरच्या स्थानावर पोचेल, अशी प्रतिक्रिया श्रीरामजन्मभूमी प्रकरणातील बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनी श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर दिली आहे. ‘बाबरीचा खटला ५० वर्षे चालला होता, हे लक्षात घ्यायला हवे’, असेही ते म्हणाले.
श्रीकृष्णजन्मभूमीसाठी आंदोलन केले जाईल ! – बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार
केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार असतांना आंदोलनाची काय आवश्यकता ?, असेच हिंदूंना वाटते !
या याचिकेविषयी ‘बजरंग दल’चे संस्थापक विनय कटियार यांनी म्हटले की, जेथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याच ठिकाणी मशीद उभी आहे. तिचा मार्ग तेथे असणार्या श्रीकृष्णजन्मभूमीवरूनच जातो. अन्य पंथाच्या लोकांनी या भूमीवर अवैध नियंत्रण मिळवले आहे. मोठे आंदोलन केल्याविना प्रशासन जागे होणार नाही. यासाठी रूपरेषा बनवावी लागेल. यात भाजप सहभागी होईल आणि अन्य संघटना त्यांचे कार्य करतील. अयोध्या, काशी आणि मथुरा यांना मुक्त करण्याचे भाजपचे आश्वासन जुनेच आहे. यांतील अयोध्येत विजय मिळाला आहे. आता मथुरा आणि काशी यांच्यासाठी आंदोलन चालू केले पाहिजे. यासाठी चर्चा केली जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात