Menu Close

कानपूर : लव्ह जिहादसाठी पाकिस्तानी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’कडून कोट्यवधी रुपयांचा अर्थपुरवठा ! – विशेष अन्वेषण पथकाची माहिती

  • लव्ह जिहाद काय आहे, हेच ठाऊक नाही, असे एका नेत्याने पूर्वी म्हटले होते, आता लव्ह जिहाद काय आहे, हे त्यांच्या लक्षात आले असेल, अशी अपेक्षा !
  • भारतातील आतंकवाद, दंगली आणि आता लव्ह जिहाद यामागेही पाकिस्तान आहे, हे लक्षात घेता या सर्व समस्यांचे मूळ म्हणजे पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे !
  • कानपूरच नव्हे, तर देशातील अन्य ठिकाणी होणार्‍या लव्ह जिहादच्या शेकडो घटनांच्या मागे कोण आहे, याचीही अशी चौकशी होण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा !

कानपूर (उत्तरप्रदेश) : येथील लव्ह जिहादच्या प्रकरणांचे अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाने केलेल्या आतापर्यंतच्या चौकशीत यासाठी पाकिस्तानमधील संघटना ‘दावत-ए-इस्लामी’कडून कोट्यवधी रुपयांचा अर्थपुरवठा होत होता, असे समोर आले आहे. या संघटनेचे भारतातही समर्थक असून ते कानपूर शहरामध्ये त्यांच्या धर्मबांधवांना हिंदूंच्या विरोधात भडकावत आहेत. त्यातूनच लव्ह जिहादच्या घटना घडल्या आहेत.

१. या पथकाचे प्रमुख विकास पांडेय यांनी म्हटले की, चौकशीतून समोर आले आहे की, आरोपींचा संबंध शहरातील अशा मशिदींशी आहे ज्यांच्यावर पाकमधील कट्टरतावादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’चे नियंत्रण आहे. या संघटनेचे मुख्यालय समजले जाणार्‍या एका मशिदीमधून या सर्वांचे नियंत्रण केले जात आहे. या मुख्यालयाच्या मशिदीशी २४ हून अधिक मशिदी जोडलेल्या आहेत. शहरातील जुही लाल कॉलोनीमधील लव्ह जिहादचे सर्व आरोपी आणि त्यांचे नातेवाईक यांचा एका मशिदीशी संबंध आहे. लव्ह जिहादसाठी इस्लामी संघटनेला कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळालेल्या आहेत. हे सर्व पैसे स्टेट बँकेच्या एका खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. या पैशांचा वापर हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्यांचे धर्मांतर करण्यासाठी मुसलमान तरुणांसाठी केला जात होता.

२. विशेष अन्वेषण पथकाचे विशेष पोलीस अधीक्षक दीपक भूकर म्हणाले की, केवळ दावत-ए-इस्लामीच नाही, तर अन्य अनेक संघटनांची माहिती मिळाली आहे. या संघटनांची माहिती यू ट्यूबवरही उपलब्ध आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *