-
‘काश्मिरींना हवे चीनचे शासन’ म्हटल्याचे प्रकरण
-
राष्ट्रीय ट्रेंडमध्ये प्रथम स्थानावर !
मुंबई : ‘काश्मिरी नागरिक स्वतःला भारतीय समजत नाहीत आणि ते भारतीयही बनू इच्छित नाहीत. त्यांना वाटते की चीनने त्यांच्यावर शासन करावे’, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. त्याचा देशभरातून विरोध केला जात आहे. यावर राष्ट्रप्रेमींनी ट्विटरवर #Abdullah_ChineseAgent हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ केला होता. काही वेळातच तो पहिल्या स्थानावर पोचला. यावर ३५ सहस्रांहून अधिक जणांनी ट्वीट्स करत अब्दुल्ला यांच्या विधानाचा विरोध केला.
हिंदु जनजागृती समितीकडून ऑनलाईन स्वाक्षरी अभियान
हिंदु जनजागृती समितीने या प्रकरणी ऑनलाईन स्वाक्षरी अभियान चालू करून फारुख अब्दुल्ला यांची खासदारकी रहित करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात