- पोलिसांवर दगडफेक
- घरे, दुकाने आणि वाहने पेटवली
- संचारबंदी लागू
गुजरात दंगलीवरून हिंदूंना तालिबानी ठरवणारे ढोंगी निधर्मीवादी आता तोंड उघडतील का ?
सत्ताधारी भाजपच्या राज्यातील हिंदूंची दयनीय स्थिती !
हजारीबाग (झारखंड) : येथे विविध ठिकाणी श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात २ हिंदूंसह तिघांची हत्या करण्यात आली, तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत.
१. श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी हजारीबागजवळील केरेदारी या गावात काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ करण्यात आली.
२. दुसर्या घटनेत हजारीबाग येथे १६ एप्रिल या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या वेळी दोन गटांमध्ये दंगल झाली. या वेळीही धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. प्रिंस सिंह आणि अनुज कुमार सिन्हा या हिंदूंची हत्याही करण्यात आली.
३. तिसर्या घटनेत हजारीबाग येथेच १७ एप्रिल या दिवशी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ग्वाला टोली मुख्य रस्त्यावर श्रीरामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. त्या वेळी यात्रेवर धर्मांधांनी दगडफेक केली. त्या वेळी दुकाने आणि वाहनांमध्ये आग लावली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
४. त्यामुळे काही पोलिसांसहित डझनभर लोक घायाळ झाले आहेत. १८ एप्रिलच्या सकाळपर्यंत येथे संचारबंदी लागू करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात