Menu Close

तृणमूल काँग्रेसच्या खासदार अभिनेत्री नुसरत जहां यांनी श्री दुर्गादेवीप्रमाणे वेश परिधान केल्याने धर्मांधांकडून त्यांना ठार मारण्याची धमकी

  • हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत ? महिला संघटना आणि मानवाधिकार आयोग आता कुठे आहेत ?
  • ‘लव्ह जिहाद’आणि  धर्मांतर यांना विरोध केल्यावर बोलणारे आता का गप्प आहेत ?
  • कुणीही देवतांचे असे मानवीकरण करणे अपेक्षित नाही !

कोलकाता (बंगाल) : बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांना महालयाच्या दिवशी इंस्टाग्राम या सामाजिक माध्यमावर त्यांचे एक छायाचित्र प्रसारित केले होते. त्यात त्यांनी श्री दुर्गादेवीप्रमाणे वेश परिधान केला होता, तसेच त्यांनी २० सप्टेंबरला श्री दुर्जापूजा करतांनाचाही एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यावर आता धर्मांधांनी नुसरत यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. नुसरत जहां यांनी हिंदु तरुणाशी विवाह केला आहे.

१. इंस्टाग्रामवर ‘एम्केखान४८६’ नावाच्या व्यक्तीने धमकी देतांना लिहिले की, तुमचा मृत्यू जवळ आला आहे. अल्लाला घाबरा. तुम्ही तुमचे शरीर झाकून ठेवू शकत नाही का ?

२. इंस्टाग्रामवर सागर हुसेन नावाच्या व्यक्तीने प्रश्‍न विचारला आहे की, तुम्ही मुसलमान असून हिंदूंचे समर्थन का करता ?

३. नुसरत जहां यांच्या हातातील त्रिशूळावरून महंमद अन्वर याने लिहिले आहे की, जर तुम्ही मुसलमान आहात, तर तुमच्या हातात हे कसे असू शकते ? अल्लाकडे शरण मागा. हिंदूंविषयी तिरस्कार व्यक्त करा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *