शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांची पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मागणी
एक मुसलमान व्यक्ती अशा प्रकारची मागणी करते; मात्र देशातील एकतरी हिंदु लोकप्रतिनिधी किंवा केंद्र आणि राज्य सरकारांमधील एकतरी हिंदु मंत्री यांनी अशी मागणी केली आहे का ?
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘द प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१’ला समाप्त करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी ‘मोगलांकडून पाडण्यात आलेल्या मंदिरांच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मशिदींना पाडून तेथील मंदिरांना त्यांच्या पूर्वस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करावे,’ अशीही मागणी केली आहे.
या पत्रामध्ये रिझवी यांनी लिहिले आहे की, ‘द प्लेसस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१’ हा कायदा काँग्रेसच्या काळात जाणीवपूर्वक बनवण्यात आला होता; कारण त्यामुळे देशात मंदिर आणि मशीद यांचा वाद सतत चालू रहावा. त्यामुळेच हा कायदा कायमचा रहित केल्यास मंदिर आणि मशीद वादही समाप्त होईल.
वसीम रिझवी यांनी लिहिलेले पत्र – (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)
मोगलांनी ९ मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी
रिझवी यांनी या पत्रात ९ मंदिरांची माहिती दिली आहे, ज्यांच्यावर मोगलांकडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत. त्यात केशव देव मंदिर, मथुरा; अटाला देव मंदिर, जौनपूर; काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी; रुद्र महालय मंदिर, गुजरात; भद्रकाली मंदिर, गुजरात; मंदिर पाडून बांधलेली अदीना मशीद, बंगाल; विजया मंदिर, विदिशा, मध्यप्रदेश आणि मंदिर पाडून बांधलेले मस्जिद कुवतुल इस्लाम कुतुब मीनार यांचा सहभाग आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात