मथुरा (उत्तरप्रदेश) : येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी स्थानिक न्यायालयात हिंदु पक्षांकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर २८ सप्टेंबरला सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने या यचिकेचा स्वीकार करून ३० सप्टेंबर या दिवशी सुनावणी चालू करण्याचा आदेश दिला. या याचिकेमध्ये श्रीकृष्णजन्मभूमी परिसरातील १३.३७ एकर भूमीवर मालकी अधिकार सांगण्यात आला आहे. तसेच येथे असलेली इदगाह मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह भगवान श्रीकृष्ण विराजमानचे सखा अग्निहोत्री यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.
३० सप्टेंबरलाच येणार बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणाचा निकाल
श्रीकृष्णजन्मभूमी परत मिळण्याच्या खटल्यावर ३० सप्टेंबरपासून सुनावणी चालू करण्यात येणार असतांनाच याच दिवशी लक्ष्मणपुरी येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून बाबरी ढाचा पाडल्याच्या खटल्यावर निकाल देण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात