अमरावती : महाराष्ट्र शासनाने सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा केला; परंतु त्याची कठोरतेने अंमलबजावणी होतांना दिसत नाही. मुंबई, नाशिक, मालेगाव, नांदेड या मोठमोठ्या शहरांसमवेत अमरावती जिल्ह्यामध्येसुद्धा गोमांस तस्करी चालूच आहे. त्यामुळे शासनाने या कायद्याची कठोरतेने अंमलबजावणी करावी, तसेच कर्नाटक शासनाने कोट्यवधी रुपयांच्या अर्थसंकल्पात केवळ मुसलमानांच्या विकासासाठीच तरतुद केलेली असून हिंदूंच्या विकासासाठी एकही रुपयाची तरतुद नाही. याचा निषेध करण्यासाठी १७ एप्रिल या दिवशी अमरावती येथील राजकमल चौक येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले.
शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा कठोर करून गुन्हेगारांना शिक्षा द्यावी ! – प्रवीण गिरी, जिल्हा संयोजक, बजरंग दल
अमरावतीमध्ये २५ टन गोमांस वाहून नेणारा ट्रक आमच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिला; परंतु त्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली की, ते गुन्हेगार सुटले याची आम्हाला शासन आणि पोलीस यांच्या वतीने काहीच माहिती मिळाली नाही. उलट आम्हाला धमकावण्यात आले आणि प्रत्येक वेळी आम्हाला असाच चुकीचा प्रतिसाद मिळतो. गोरक्षकांचा जीव धोक्यात असून शासनाने त्यांचे संरक्षण करावे. गोवंश हत्याबंदी कायदा कठोर करून गुन्हेगारांना शिक्षा द्यावी.
हिंदूंच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद न करणे घटनेत कोणत्या तत्त्वात बसते ! – सौ. अनुभूती टवलारे, हिंदु जनजागृती समिती
एकीकडे धर्मनिरपेक्षता असल्याचे सांगून दुसरीकडे हिंदूंच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद न करता भेदभाव करणे, हे घटनेच्या कोणत्या तत्त्वात बसते ? कर्नाटक राज्यामध्ये नेहमीच हिंदूंच्या विकासाला दुय्यम स्थान देण्यात येते.
या आंदोलनामध्ये श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित यांनी गोरक्षा करत असतांना त्यांना आलेले अनुभव सांगितले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या आणि गोमाता भक्त कु. राधिका मोहोड यांनीसुद्धा त्यांचे मत व्यक्त करतांना पंचगव्याचे महत्त्व सांगितले. श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव यांनीही त्यांचे विचार मांडले.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. खेडकर, भगवे वादळ संघटनेचे श्री. अतुल खोंड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, श्री. श्याम सांगूनवेढे, श्री. तुषार वानखडे, श्री. सुधीर देशपांडे, श्री. संकेत टवलारे आणि सनातन संस्थेच्या सौ. अरूणा बिंड, सौ. छाया टवलारे, श्रीमती ज्योती खाडे यांसह ५० हिंदुत्ववाद्यांची उपस्थिती होती. वरील विषयांचे निवेदन जिल्हाधिकार्यां ना १८ एप्रिल या दिवशीदेण्यात आले.
क्षणचित्रे
१. आंदोलनाच्या सिद्धतेसाठी धर्मशिक्षणवर्गातील मुलांनी आणि इतर हिंदुत्ववाद्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
२. तापमान पुष्कळ अधिक असूनसुद्धा हे कार्यकर्ते एक घंटा पूर्वीपासून सेवेसाठी आले.
३. श्री. प्रविण गिरी यांनी प्रत्येकी १५ दिवसांनी असे आंदोलन व्हायला हवे आणि आम्ही या कार्यात सहभाग घेऊ, असे मत आंदोलन झाल्यावर व्यक्त केले.
४. विश्वस हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश चिकटे काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी २ वेळा भ्रमणभाषद्वारे दिलगिरी व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात