- हिंदूंच्या धर्मस्थानाच्या असणार्या महाविद्यालयाचे प्राचार्य अन्य धर्मीय कशाला ? या पदासाठी एकही हिंदु व्यक्त पात्र नाही का ?
- आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होण्यासह अशा प्रकारे तिरुपती मंदिरावर आघात करण्यात येत आहेत. त्यांचे वडील मुख्यमंत्री असतांनाही या मंदिराच्या प्रसादाचे कंत्राट ख्रिस्ती व्यक्तीला देण्यात आले होते. मुख्यमंत्री जगनमोहन हेही मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी नियमानुसार श्री व्यंकटेश्वरावर श्रद्धा असल्याचे लेखी सांगण्याची तसदी घेत नाहीत, हे याचेच लक्षण आहे. हिंदू आणखी किती दिवस धर्मनिरपेक्षतेची गोळी घेऊन झोपणार आहेत ?
तिरुपती (आंध्रप्रदेश) : तिरुपती येथे असलेल्या श्री व्यंकटेश्वर कला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. ख्रिस्तोफर यांची नेमणूक झाली आहे. आधी श्रीमती नारायणम्मा या महाविद्यालयाचे प्राचार्य होत्या. त्या सुट्टीवर गेल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी डॉ. ख्रिस्तोफर यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याकडे २६ सप्टेंबरपासून कार्यभार सोपवण्यात आला आहे. या पूर्वीही या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी अहिंदु व्यक्तीची नेमणूक वादग्रस्त ठरली होती. या कला महाविद्यालयाची स्थापना वर्ष १९४३ मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानम् समितीचे माजी अध्यक्ष व्ही. रघुनाथ रेड्डी यांच्या सूचनेवरून करण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात