हिंदु जनजागृती समितीकडून पत्र लिहून विरोध
मुंबई : गुजरातमधील कर्णावती येथील आर्चर आर्ट गॅलरीकडून चित्रकारांच्या चित्रांची विक्री करण्यात येते. या गॅलरीच्या संकेतस्थळावरून काही चित्रांची ऑनलाईन विक्री करण्यात येणार आहे. यामध्ये हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या काही चित्रांची समावेश आहे. ‘archerindia.com/m-f-husain’ या लिंकवर ही चित्रे ठेवण्यात आलेली आहेत. याची माहिती धर्मप्रेमींकडून मिळाल्यावर हिंदु जनजागृती समितीने या गॅलरीला याविषयी प्रबोधन करणारे पत्र पाठवले आहे. याद्वारे हुसेन यांची चित्रे काढण्याची आणि त्यांचे उदात्तीकरण थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘हुसेन यांनी हिंदु देवता आणि भारतमाता यांची नग्न चित्रे काढून त्यांचा लिलाव केला आहे. त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक आणि राष्ट्रीय भावना दुखावलेल्या आहेत’, असे यात म्हटले आहे. या पत्रावर अद्याप कोणताही उत्तर मिळालेले नाही.
हिंदु धर्माभिमानी पुढील संपर्कावर वैध मार्गाने निषेध नोंदवत आहेत.
ई मेल : [email protected]
दूरभाष : ७९४००६७६४१ / ७९२७४१३८७२
राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !
हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !