‘ब्राह्मण संस्कृतीने मागासवर्गियांच्या केलेल्या पिळवणुकीचा उत्कृष्ट नमुना’, असा लुईस फ्राईस् या ख्रिस्ती पाद्रीने लिहिलेला पोर्तुगीज भाषेतील ग्रंथ पोर्तुगालच्या संग्रहालयात आहे. त्यात कथित ब्राह्मणी कारस्थानावर प्रकाश पाडला आहे.’
ख्रिस्ती मिशनर्यांनी ‘हिंदु धर्म आणि संस्कृती अधम असून ख्रिश्चन धर्म हाच कसा श्रेष्ठ अन् तारक आहे’, हेे दाखवण्याकरता प्रचंड वाङ्मय निर्माण केले. ‘ब्राह्मण वर्ण हा बुद्धीमान, चारित्र्य संपन्न आणि श्रेष्ठ असून समस्त हिंदूंना तो आधार आहे. त्याला फोडल्याविना हिंदूंचे धर्मांतर असंभव आहे’, हे मिशनर्यांनी ओळखले. त्यांनी तसे प्रयत्न केले; परंतु त्यांना यश येईना ! म्हणून त्यांनी सैन्य बळावर ब्राह्मणांचे प्रचंड हत्याकांड केले आणि ‘शूद्र अंत्यजादी जातींवर ब्राह्मणांनी जुलूम अन् अत्याचार केले’, असे वाङ्मय निर्माण करून हिंदूंच्या देवतांची निंदा चालू केली. तीच शस्त्रे परजून पुढे यच्चयावत् प्रबोधनवादी, समाजवादी, सेक्युलरवादी, पुरोगामी, मानवतावादी आणि सुधारक यांनी वापरली अन् सनातन हिंदु धर्म, तसेच संस्कृतीचा विध्वंस केला.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०१७)