फारुख अब्दुल्ला यांनी ‘काश्मिरींना हवे चीनचे शासन’, असे म्हटल्याचे प्रकरण
मुंबई : काश्मिरी नागरिक स्वतःला भारतीय समजत नाहीत आणि ते भारतीयही बनू इच्छित नाहीत. त्यांना वाटते की, चीनने त्यांच्यावर शासन करावे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. त्याचा देशभरातून विरोध केला जात आहे. याविरोधात हिंदु जनजागृती समितीने ‘ऑनलाईन’ मोहीम राबवून केंद्रीय गृहमंत्र्यांना ऑनलाईन निवेदन पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २८ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आलेल्या मोहिमेला ४ दिवसांतच १ सहस्र १०० हून अधिक जणांनी ऑनलाईन स्वाक्षरी करून हे निवेदन पाठवले आहे.
अधिकाधिक लोकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपले राष्ट्रकर्तव्य बजावण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
ऑनलाईन याचिकेची लिंक : https://www.hindujagruti.org/hindi/anti-india-abdullah