मुसलमान नागरिक आणि सुलतान यांच्यावर कथित आक्षेपार्ह टिपणी केल्याच्या प्रकरणी गोरखपूरमधील अभियंत्याला संयुक्त अरब अमिरातीत १५ वर्षांची शिक्षा अन् १ कोटी रुपये दंड
दंड न भरल्यास आजन्म कारावासात ठेवण्याचा आदेश
भारत सरकारकडून अभियंत्याला सोडण्याची विनंती
- हिंदूबहुल भारतात मात्र धर्मांधांकडून हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधले जाऊनही त्यांच्यावर साधी कारवाईही होत नाही !
- इस्लामी राष्ट्रात हिंदूंची होणारी परवड जाणा ! याविषयी एकही काँग्रेसी, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे, डावे, समाजवादी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
अबूधाबी : मुसलमान नागरिक आणि संयुक्त अरब अमिरातीचे सुलतान यांच्यावर कथित आक्षेपार्ह टिपणी केल्याच्या प्रकरणी मूळचे उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधील अभियंता अखिलेश पांडे यांना संयुक्त अरब अमिरातीत १५ वर्षांची शिक्षा अन् १ कोटी रुपये (भारतीय चलनानुसार) दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आजन्म कारावासात ठेवण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. विशेष म्हणजे पांडे यांच्याविरुद्ध पोलिसांना कुठलेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत, तरीही त्यांना शिक्षा देण्यात आली आहे. पांडे यांच्या पत्नीने भारत सरकारला आवाहन केल्यानंतर भारत सरकारने संयुक्त अरब अमिराती सरकारकडे पांडे यांना दया दाखवून भारतात पाठवण्याची विनंती केली आहे.
१. अखिलेश पांडे हे १० वर्षांपासून रास अल् खेमा या सिमेंट आस्थापनाचे वरिष्ठ सुरक्षा अभियंता आहेत. त्यांच्या हाताखाली सुडानमधील अब्दुल मनीम एल्-जैक, पाकिस्तानी नागरिक राणा माजीद, भारताच्या राजस्थानमधील महंमद हुसैन खान आणि भाग्यनगर येथील महंमदुल्लाह शेख हे चौघे कामगार काम करत होते.
२. यांपैकी अब्दुल मनीम एल्-जैक आणि राणा माजीद यांनी सुटीसाठी पांडे यांच्याकडे खोटी कागदपत्रे जोडली होती. पांडे यांनी या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ती खोटी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी या दोघा कामगारांनी पुन्हा असे न करण्याची ताकीद देत त्यांच्यावर कारवाई न करताच त्यांना सोडून दिले. तथापि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पांडे यांनी त्यांच्या वरिष्ठांना या प्रकरणाची कल्पना दिली.
३. यानंतर अब्दुल मनीम एल्-जैक आणि राणा माजीद यांनी पांडे यांना परिणाम भोगण्याची धमकी दिली.
४. या घटनेच्या दुसर्याच दिवशी अब्दुल मनीम एल्-जैक, राणा माजीद, महंमद हुसैन खान आणि महंमदुल्लाह शेख हे अखिलेश पांडे यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांच्याशी भांडू लागले.
५. काही वेळाने या चौघांनी पांडे यांना पकडून बाहेर ओढत आणले आणि कार्यालयातील अन्य उपस्थितांना ‘पांडे यांनी मुसलमान नागरिक आणि संयुक्त अरब अमिरातीचे सुलतान यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली’, असे खोटेच सांगितले.
६. यानंतर पोलिसांनी पांडे यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना तेथील राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक केली.
७. यानंतर पांडे यांच्या पत्नीने भारतात परतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून त्यांच्या पतीच्या सुटकेची मागणी केली.
संयुक्त अरब अमिरातीत ३ किंवा ३ पेक्षा अधिक लोकांनी कुराणची शपथ घेऊन जबाब नोंदवल्यास संबंधितांवरील आरोप पुराव्यांविनाही केला जातो मान्य !
पोलिसांना पांडे यांच्याविरुद्ध कुठलेही पुरावे मिळाले नाहीत; परंतु तरीही चौघा कामगारांच्या जबाबावर पांडे यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट केले. तथापि संयुक्त अरब अमिरातीतील नियमांनुसार, जर ३ किंवा ३ पेक्षा अधिक लोकांनी कुराणची शपथ घेऊन जबाब नोंदवल्यास संबंधितांवरील आरोप कुठल्याही पुराव्यांविनाही मान्य केला जातो. याच आधारावर अबूधाबी येथील न्यायालयाने पांडे यांना २ फेब्रुवारी २०२० या दिवशी शिक्षा ठोठावली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात