Menu Close

आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली

पॅरिस/बाकू – आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटना अर्थात् इसिसने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. या आतंकवाद्यांनी तुर्कस्तानच्या साहाय्याने गजिआनटेपच्या मार्गे नागोना-काराबाख भागात प्रवेश मिळवला आहे.

इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ब्रसेल्समध्ये म्हटले की, याविषयी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनीही ‘मलाही ही माहिती मिळाली आहे’ असे सांगितले.

रशिया आणि तुर्कस्तान यांच्यात युद्ध होण्याची भीती

इमॅन्युअल मॅक्रॉन म्हणाले की, ‘नाटो’ देशांतील सदस्य देश म्हणून तुर्कस्तानने अझरबैजानला साहाय्य करण्याचे उचललेले पाऊल चुकीचे असून त्याची घृणा वाटते.’ तुर्कस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे तणावात आणखी वाढ झाली असून आता रशिया आणि तुर्कस्तान यांच्यात युद्ध होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अझरबैजानला पाक आणि तुर्कस्तान यांनी रसद पुरवल्याची चर्चा

आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असलेले पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांनी आर्मेनियाविरुद्धच्या युद्धासाठी अझरबैजानच्या साहाय्याला सैन्य आणि आतंकवादी पाठवले असल्याची चर्चा आहे. काही वृत्तांनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना अझरबैजानमध्ये पाठवत आहे. तुर्कस्तानकडून या आतंकवाद्यांना १ सहस्र ५०० ते २ सहस्र डॉलर (१ लाख ४६ सहस्र रुपये) इतकी रक्कम दिली जात आहे. पाकिस्तानी सामाजिक माध्यमांतही अझरबैजानच्या समर्थनात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *