भारतात गेल्या ३ दशकांपासून इस्लामी फुटीरतावाद्यांच्या कारवाया चालू असतांना भारताने कधीही त्यांच्या विरोधात कायदा करण्याचा प्रयत्नही केला नाही, हे लक्षात घ्या !
पॅरिस (फ्रान्स) – पुढील वर्षी इस्लामी फुटीरतावाद्यांच्या विरोधात नवीन कायदा बनवला जाईल, अशी घोषणा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांनी केली. गेल्या काही वर्षांपासून या फुटीरतावाद्यांमुळे फ्रान्स त्रस्त आहे.
France President #EmmanuelMacron pledged to fight “Islamist separatism” which he said was threatening to take control in some Muslim communities around France.https://t.co/ky5LEsPTZg
— The Hindu (@the_hindu) October 2, 2020
१. फ्रान्सच्या अधिकार्याने सांगितले की, या कायद्यामुळे जे राष्ट्रीय कायद्यांचे पालन करत नाहीत, त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही; कारण या फुटीरतावाद्यांना वाटते की, ते देशातील कायद्यांपेक्षा मोठे आहेत. फ्रान्समध्ये विदेशी इमामांना येऊन प्रशिक्षण देण्यावरही बंदी असणार आहे.
२. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गेल्या ५ वर्षांत फ्रान्समध्ये जिहादी गटांमुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या आक्रमणात २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात