गर्भवती झाल्यानंतर मुलीला जन्म देऊन पीडितेचा मृत्यू
|
बाराबंकी (उत्तरप्रदेश) – येथील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या एका गावामध्ये स्वतःच्या १६ वर्षांच्या मुलीवर धर्मांधाने सातत्याने बलात्कार केल्याची आणि त्यामुळे ती गर्भवती झाल्याची घटना घडली. पीडित मुलीने वडील गुलाम रसूल याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तिच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात भरती केल्यावर तिने एका मुलीला जन्म दिला आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, रसूल हा गुन्हेगारी वृत्ताचा असून त्याच्यावर दरोडे आणि आक्रमणे करणे, अशा गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी त्याला अनेकदा अटकही झाली आहे. त्याच्या पत्नीचा २ वर्षांपूर्वी ८ व्या मुलाला जन्म देतांना मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने मुलीचे लैंगिक शोषण करणे चालू केले होते. पोलीस रसूल याचा शोध घेत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात