२ सहस्र ५०० हिंदूंची उपस्थिती
वावुनिया (श्रीलंका) – श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. सचितानंदनजी, शिवसेनाई यांच्या नेतृत्वाकाली सर्व हिंदु संघटनांनी शासनाकडे ६ कलमी मागण्या मांडत लंकेतील वावुनिया येथे एक भव्य मिरवणूक काढली. यात सुमारे २ सहस्र ५०० हिंदू सहभागी झाले होते.
१. १ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ८ वाजता कुरुमानकडू येथील श्री कालिमान मंदिर येथून या मिरवणुकीला प्रारंभ होऊन ती श्री कांदसामी मंदिरात येऊन समाप्त झाली. या मिरवणुकीत ७ देखावे, ५० कापडीफलक आणि सुमारे १ सहस्र हस्तफलक यांचा समावेश होता. यात मोठ्या संख्येने महिला आणि मुले सहभागी झाली होती. महिलांनी हातात पारंपारिक दिवे आणि कलश घेतले होते. अनेकांनी नंदीचे ध्वज उंचावले होते. संपूर्ण मिरवणुकीत भजन गायले जात होते. ही मिरवणूक २ कि.मी.पर्यंत लांब होती. ४ खंडांतील १० देशांतील प्रमुख हिंदु संघटनांनी लंकेतील हिंदूंविषयी एकता दर्शवण्यासाठी अभिनंदन संदेश पाठवले होते.
२. लंकेत गोहत्या बंदीच्या सरकारच्या निर्णयाविषयी आनंद व्यक्त करण्यासाठी मिरवणूक काढण्याविषयी हिंदुत्वनिष्ठ श्री. माधवन् यांनी श्री. सचितानंदनजी यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी वावुनिया येथे एक विशाल ‘हिंदु जागरूकता मिरवणूक’ आयोजित करण्याची आणि त्या माध्यमातून शासनावर ‘हिंदूंच्या कल्याणासाठी लवकरात लवकर कायदे आणण्यासाठी दबाव आणावा’, अशीही सूचना केली. यानुसार ६ सदस्यांची समिती नेमून या मोठ्या मोच्यार्र्चे नियोजन केले होते. याचा परिणाम म्हणून आता इतर अनेक हिंदु संघटना आपापल्या ठिकाणी अशी मिरवणूक काढण्यास उद्युक्त झाल्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात