-
संभाजीनगर येथे पुन्हा ‘लव्ह जिहाद’ !
-
युवतीच्या तक्रारीवर पोलिसांकडून गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ
-
शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे पोलिसांकडून धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद
धर्मांधाविरुद्धच्या तक्रारी नोंदवून घ्यायला टाळाटाळ करणार्या पोलिसांवरच कठोर कारवाई व्हायला हवी ! पीडित हिंदु युवतीच्या साहाय्याला धावून येणार्या शिवसैनिकांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा !
संभाजीनगर : परभणी येथून आलेल्या २४ वर्षीय हिंदु युवतीसह धर्मांधाने प्रेमाचे नाटक करून बळजोरीने धर्मांतर करून लग्न केले. लग्नानंतर ३ मासांंची गर्भवती असलेल्या पत्नीला एक लाखाच्या खंडणीसाठी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची नोंद न घेता टाळाटाळ करणार्या बेगमपुरा पोलिसांना शिवसेनेने हिसका दाखवताच त्यांनी धर्मांधांसह तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. महंमद उमर महंमद जावेदसह भ्रमणभाषच्या माध्यमातून या हिंदु युवतीची मैत्री झाली. उमर याने या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर उमर याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. युवतीने सातारा पोलीस ठाण्यात महंमद नूर आणि महंमद इस्माईल यांच्या विरोधात तक्रार दिल्याने गुन्हा नोंद झाला.
युवतीने बलात्काराची तक्रार दिल्यानंतर महंमद इब्राहिम, महंमद अहमद, रिहानाबानो, हुस्ना बेगम यांनी युवतीचे घर गाठत ‘उमरशी लग्न करायचे असेल, तर तुला मुसलमान धर्म स्वीकारावा लागेल’, अशी धमकी देत बलात्काराचे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली. अपकीर्ती होईल या भीतीने युवतीने लग्नास होकार दिला. त्यानंतर धर्मांतर आणि खंडणीचा प्रकार झाला. या त्रासाला कंटाळून युवतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली. हे समजताच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आयुक्तांना खडेबोल सुनावले. १ ऑक्टोबर या दिवशी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, उपशहरप्रमुख हिरा सलामपुरे, तालुकाप्रमुख हनुमंत भोंडवे, शिवसेना महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार आदींनी आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात महंमद उमर महंमद जावेद, महंमद इब्राहिम, हुस्नाबेगम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात