- सामाजिक ऐक्यासाठी आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले ? या प्रयत्नांना अजूनही यश का आले नाही ? याचेही उत्तर पवार यांनी जनतेला देणे अपेक्षित आहे !
- देशात हिंदूंची सहस्रावधी मंदिरे मोगलांनी उद्ध्वस्त केली, त्या वेळी सामाजिक ऐक्याची चिंता पवार यांना वाटली नाही. आता श्रीरामाचे मंदिर बांधण्यास प्रारंभ झाल्यामुळे आणि काशी, मथुरा यांचे सूत्र आल्याने पवार यांना सामाजिक ऐक्याची काळजी वाटू लागली आहे ! ‘अर्थात् रामायण, महाभारत यांची देशाला आवश्यकता नाही’, असे म्हणणार्यांकडून आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्यांकडून वेगळी कोणती अपेक्षा करणार ?
मुंबई : आता काशी, मथुरा अशीही चर्चा चालू झाल्याचे दिसते. त्यामुळे देशाचे सामाजिक ऐक्य कसे टिकणार, याची काळजी आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे, असे ‘ट्वीट’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ ऑक्टोबर या दिवशी केले आहे. अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हिंदूंकडून मोगल आक्रमणकर्त्यांनी विध्वंस केलेली हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे काशी आणि मथुरा यांचीही पुनर्उभारणी व्हावी, अशी उत्स्फूर्त भावना प्रकट होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वरील ‘ट्वीट’ करून शंका उपस्थित केली आहे.
याविषयी आणखी एका ‘ट्वीट’मध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे की, बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाच्या निकालाच्या प्रकरणी मी न्यायमूर्तींविषयी काही बोलणार नाही; पण मी माधव गोडबोले (माजी केंद्रीय गृहसचिव) यांचे विधान टी.व्ही.वर ऐकले. ‘सगळ्या प्रकारचे पुरावे या ठिकाणी दिल्यानंतरही असा निर्णय होतो, याचे मला आश्चर्य वाटते’, हे उद्गार माधव गोडबोले यांचे होते. ज्या वेळी बाबरी मशिदीच्या विध्वंसाचा प्रकार झाला, त्या वेळी मी केंद्रशासनामध्ये संरक्षणमंत्री होतो. विषय माझा नव्हता; पण मला आठवत आहे, नरसिंह राव, शंकरराव चव्हाण आणि आम्ही सहकारी यांच्या कानावर तेव्हाचे केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी काही वस्तूस्थिती घातली होती. उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी अभिवचन दिले होते, ‘बाबरी मशिदीच्या वास्तूला धक्का बसणार नाही’; पण ‘हे अभिवचन पाळले जाणार नाही’, असे मत माधव गोडबोले यांनी मांडले होते. नरसिंह राव मात्र ‘उत्तरप्रदेश राज्यप्रमुखांच्या विधानावर विश्वास ठेवला पाहिजे’, या मताचे होते. त्यामुळे गोडबोले यांच्या मताचा स्वीकार झाला नाही. दुर्दैवाने त्याची परिणती जे गोडबोले यांना वाटत होते त्यामध्येच झाली. माधव गोडबोले यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास आधीच केला होता. नंतर काय होईल, याचीही निश्चिती त्यांना होती. नंतर जे घडले, ते त्यांनी डोळ्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाविषयी मनातली अस्वस्थता माध्यमांकडे नमूद केली, त्याविषयी मला आश्चर्य वाटलेले नाही.’
शरद पवार यांच्या ट्वीटवर समाजातून टीकेची झोड
शरद पवार यांच्या या ट्वीटवर अनेकांनी (नेटकर्यांनी) टि्वटरवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून टीकेची झोड उठवली आहे. यांतील काही निवडक प्रतिक्रिया पुढे दिल्या आहेत.
१. आपले उद्गार स्पष्ट काय ते सांगा. इतरांच्या खांद्यावर बंदुका ठेवून त्या का चालवता ?
२. साहेब, समजू शकतो पुष्कळ दु:ख झालय तुम्हाला. सावरा आता स्वत:ला, अजून काशी, मथुरा बाकी आहे.
३. नका तुम्ही काळजी करू. ३०५ खासदार असलेले बसलेत तिकडे काळजी करायला देशाची. आता तुम्ही आराम करा. या वयात दगदग नको.
४. साहेब, मुसलमान समुदायाने प्रेमाने जागा देऊन टाकली, तर धार्मिक सलोखा मस्त टिकेल. हिंदूंनी अनेक मंदिरे धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी प्रेमाने देऊन टाकली आहेत. केवळ २ जागा दिल्याने देशात प्रेमाचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल. त्यांना म्हणा एकदा तुम्हीपण धार्मिक सलोखा टिकवून बघा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात