२ धर्मांधांना अटक
धर्मांधांचे वासनांध स्वरूप वेळीच ओळखा ! त्यांच्या बोलण्याला बळी न पडता महिलांनी सतर्क रहाणेच महत्त्वाचे !
मुंबई : दिंडोशी येथे एका ओळखीच्या विवाहित महिलेला कामानिमित्त घरी बोलावून फैयाज शेख याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण करून फैयाज याने स्वत:सह मित्रांकरवी महिलेवर वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी महिलेने दिंडोशी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी शेख आणि सादिक पटेल या आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी नदीम याने पलायन केले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये तिच्यावर वर्ष २०१८ पासून अशा प्रकारचे अत्याचार चालू होते. याविषयी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत तिने फैयाज शेख याने कामाच्या निमित्ताने घरी बोलावून शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार केल्याचे म्हटले आहे. अत्याचाराचे व्हिडिओ फैयाज याने सादिक आणि नदीम यांनाही पाठवले. त्या दोघांनीही धमकावून महिलेचे लैंगिक शोषण केले. याविषयी वाच्यता केल्यास पीडितेच्या पतीला सांगण्याची धमकी दिली. शेवटी धर्मांधांच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या महिलेने स्वत:च्या पतीला याविषयी माहिती दिली. त्यानंतर याविषयी दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून त्याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात