बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या हत्यांची शृंखला चालूच !
- एरव्ही देशात कुठे ढोंगी पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यावर आकाशपाताळ एक करणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बंगालमध्ये सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असतांना तोंड का उघडत नाहीत ? कि ‘भाजपच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या हत्या व्हायलाच हव्यात’, असे त्यांना वाटते ?
- बंगालमध्ये पोलीस ठाण्यासमोरच हत्या होते यावरून तेथे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते !
कोलकाता : बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील टीटागड पोलीस ठाण्यासमोरच भाजपचे जिल्हा समितीचे सदस्य आणि माजी नगरसेवक मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली. या घटनेनंतर परिसराला छावणीचे रूप प्राप्त झाले असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येनंतर भाजप नेत्यांनी बॅरेकपूरमध्ये बंदचे आवाहन केले आहे, तर राज्यपालांनी घटनेची नोंद घेत कायदा अन् सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना राजभवन येथे बोलावले आहे.
१. मनीष शुक्ला ४ ऑक्टोबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास भाजप कार्यालयात बसले होते. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी शुक्ला यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीररित्या घायाळ झाले; मात्र उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबारात आणखी एक व्यक्ती घायाळ झाली आहे.
२. मनीष शुक्ला यांच्या हत्येचे अन्वेषण सीबीआयकडून करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात