ब्रिटनमधील भारतियांच्या विरोधाचा परिणाम
विदेशातील हिंदू हे हिंदु धर्माचा अवमान होत असेल, तर लगेच जागृत होऊन विरोध करतात, तर भारतातील हिंदू निष्क्रीय आणि निद्रिस्त असतात !
नवी देहली : ब्रिटनमधील एका शाळेच्या संकेतस्थळावरून ‘ब्रिटीश जी.सी.एस्.ई. धार्मिक स्टडीज वर्कबूक’ हटवण्यात आले आहे. तसेच प्रकाशकानेही हे पुस्तक मागे घेतले आहे. येथील भारतियांनी केलेल्या विरोधानंतर ही कृती करण्यात आली. या पुस्तकामध्ये हिंदूंना आतंकवादी म्हणण्यात आले होते.
वेस्ट मिडलँड्स येथील सोलिहुल भागातील लँगली स्कूलच्या संकेतस्थळावरून हे पुस्तक डाऊनलोड करता येऊ शकत होते. या पुस्तकामध्ये जगातील सर्व धर्मांविषयी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती.
या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ४ वर हिंदु धर्माचे वर्णन होते. त्यात गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शस्त्र घेऊन युद्ध करण्यास सांगत आहे, याविषयीची माहिती होती. यात लिहिले होते, ‘जर कारण योग्य असेल, तर हिंदूंनी शस्त्र हातात घेतले पाहिजे. काही हिंदूंनी त्यांच्या परंपरांचे रक्षण करण्यासाठी आतंकवादाची वाट चोखाळलेली आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात