Menu Close

लोणावळा (जिल्हा पुणे) शहरात हिंदु नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समितीची भव्य शोभायात्रा

lonavala

लोणावळा : शहरात गुढीपाडवा आणि हिंदु नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समिती लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसर यांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत ६ सहस्र दुचाकी वाहनांसह १२ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. ही शोभायात्रा पुरंदरे ग्राऊंड लोणावळा ते खंडाळा, तुंगार्ली, वलवण, वरसोली, वाकसई चाळ, कार्ला फाटा या मार्गावर ३ घंटे शिस्तबद्धपणे चालू होती. प्रत्येक गावाची वेस आणि काही चौकांमध्ये शोभायात्रेचे पुष्पवृष्टी करत स्वागतही करण्यात आले. कार्ला गावातील ऐतिहासिक तलावाजवळ शोभायात्रेची सांगता झाली. या वेळी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थित हिंदूंना हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *