Menu Close

पाकिस्तान : हिंदु मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या वृद्ध पित्याची हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी जगभरातील हिंदू मौन बाळगून आहेत; मात्र चीन वगळता कुठेही मुसलमानांवर अत्याचार झाल्यास मुसलमानांच्या  संघटना आणि नेते याचा विरोध करतात !

कराची (पाकिस्तान) : पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना प्रतिदिन चालूच आहेत. पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतःच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या वडिलांना ठार करण्यात आले आहे.

१. महंमद अजमत याच्यासह काही सशस्त्र धर्मांधांनी शिव कोहली यांच्या घरात घुसून त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी कोहली यांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा धर्मांधांनी कोहली यांच्यावर अमानुष अत्याचार करत त्यांना ठार केले. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याऐवजी मुलीच्या कुटुंबियांनाच अटक केली आहे.

२. यापूर्वी २ जून या दिवशी ६ सशस्त्र धर्मांधांनी एका १३ वर्षीय हिंदु मुलीच्या कुटुंबियांना मारहाण करून तिचे अपहरण करण्यात आले आणि तिच्यावर रात्रभर बलात्कार केल्याची घटना घडली होती. याच मासामध्ये एका १४ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *