Menu Close

दिल्ली : बहिणीवर प्रेम केल्याच्या रागातून मुसलमान भावाकडून हिंदु तरुणाची हत्या

हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अपहरण, धर्मांतर आणि नंतर विवाह करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात काहीही केले जात नाही; मात्र मुसलमान तरुणीवर हिंदु तरुणाने प्रेम केले, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या !

नवी देहली – येथील आदर्शनगरमध्ये महंमद अफरोज आणि महंमद राज यांनी त्यांच्या साथीदारांच्या साहाय्याने १८ वर्षीय राहुल राजपूत याची अमानुष मारहाण करत हत्या केली. राहुल महंमद अफरोज याच्या १६ वर्षीय बहिणीवर प्रेम करत होता. त्यातून ही हत्या करण्यात आली.

पोलिसांनी अफरोज, राज यांच्यासमवेत ५ जणांना अटक केली आहे. यात ३ जण अल्पवयीन आहेत. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या मारहाणीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. येथे धार्मिक तणावामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *