Menu Close

माता श्री लक्ष्मीदेवी आंतरिक सुंदरतेची प्रेरणा देते ! – सलमा हायक

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायक यांनी ‘इन्स्टाग्राम’वर श्री लक्ष्मीदेवीचे चित्र पोस्ट करून केले गुणगान !

  • सलमा हायक या कॅथोलिक ख्रिस्ती आहेत, तरीही त्यांना माता श्री लक्ष्मीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते. भारतातील ख्रिस्ती मिशनरी मात्र हिंदूंच्या देवतांना थोतांड ठरवत असतात, तसेच तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदूही त्यांचीच री ओढत रहातात !
  • हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार चित्रपटांद्वारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करतात. किती हिंदी कलाकारांना हिंदूंच्या देवतांचे आध्यात्मिक महत्त्व कळते ?

नवी देहली – हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायक यांनी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमामध्ये एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, माता श्री लक्ष्मीदेवी आंतरिक सुंदरतेची प्रेरणा देते. जेव्हा मी माझ्या आंतरिक सुंदरतेशी अनुसंधान साधू इच्छिते, तेव्हा माता श्री लक्ष्मीदेवीचे ध्यान करते आणि योग करते.

माता श्री लक्ष्मीदेवी हिंदु धर्मामध्ये धन, सौभाग्य, प्रेम, सुंदरता, माया, आनंद आणि समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते. त्यांची प्रतिमा आनंद देणारी आहे. आनंद तुमच्या आंतरिक सुंदरतेचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे.’ या पोस्टसह त्यांनी माता श्री लक्ष्मीदेवीचे चित्रही पोस्ट केले आहे.

१. सलमा यांच्या या पोस्टवर हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यात ज्युलिया रॉबर्ट्स, रसेल ब्राँड, मायली सायरस यांचा समावेश आहे. भारतातही अभिनेत्री बिपाशा बसू यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

When I want to connect with my inner beauty, I start my meditation focusing on the goddess Lakshmi, who in Hinduism represents wealth, fortune, love, beauty, Māyā (literally meaning "illusion" or "magic”), joy and prosperity. Somehow her image makes me feel joyful, and joy is the greatest door for your inner beauty. Cuando quiero conectarme con mi belleza interior, comienzo mi meditación enfocándome en la diosa Lakshmi, quien en el hinduismo representa la riqueza, la fortuna, el amor, la belleza, Māyā (que literalmente significa "ilusión" o "magia"), alegría y prosperidad. De alguna manera su imagen me trae alegria, y piensa que la alegría es la puerta más directa para tu belleza interior. #innerbeauty #hinduism #lakshmi #meditation

A post shared by Salma Hayek Pinault (@salmahayek) on

२. सलमा हायक यांना वर्ष २००३ मध्ये ‘वन्स अपॉन ए टाइम इन मैक्सिको’ या चित्रपटामुळे ओळख मिळाली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *