Menu Close

(म्हणे) ‘भाजपने आगीशी खेळू नये !’ : चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्स

देहलीतील चीनच्या दूतावासाबाहेर भाजपने तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा फलक लावल्याने चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सची धमकी

चीनच्या दैनिकाच्या अशा पोकळ धमक्यांना भाजप भीक घालणार नाही, हेही तितकेच खरे !

बीजिंग (चीन) : भाजपचे देहलीतील नेते तेजिंदरसिंह बग्गा यांनी १० ऑक्टोबरला असलेल्या तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त देहलीतील चीनच्या दूतावासासमोर तैवानला शुभेच्छा देणारे फलक लावले होते. यामुळे चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्से ‘भारताच्या सत्ताधारी भाजपने मूर्खांसारखे वागणे सोडावे आणि हे लक्षात ठेवावे की, तो आगीशी खेळत आहे’, अशी धमकी दिली आहे. तसेच ‘आधीपासूनच वाईट झालेले संबंध आणखी वाईट होतील’, असेही म्हटले आहे. (वाईट झालेले संबंध चांगले होण्यासाठी चीन काय प्रयत्न करत आहे, हे ग्लोबल टाइम्सने सांगावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *