मशिदींजवळ रहाणार्या मुसलमानेतरांकडूनही मशिदीसाठी उकळले जाते शुल्क
हे गाव भारतात आहे कि पाकिस्तानात ?, असा प्रश्न कुणाला पडल्यास आश्चर्य वाटू नये ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ?
चेन्नई (तमिळनाडू) : राज्यातील तेनकास जिल्ह्यातील वडाकराई गावात प्रवेश करणार्या प्रत्येक वाहनाकडून धर्मांध प्रवेश शुल्क (जिझिया कर) वसूल करत आहेत. ट्रकसाठी ४० रुपये, लहान ट्रकसाठी ३०, रिक्शासाठी २५, हातगाड्यांसाठी १५, तर सायकलसाठी १० रुपये वसूल करण्यात येत आहेत, अशी माहिती ट्विटरवर एका वापरकर्त्याने छायाचित्रासह प्रसारित केली आहे. यावर अनेक जणांनी संताप व्यक्त केला आहे. हे शुल्क अद्याप कोणत्या हेतूने आकारले जात आहे, याविषयी स्पष्टता नाही. वडाकराई गावात ६५ टक्के लोकसंख्या मुसलमानांची आहे.
‘इंदू मक्कल कच्ची’ (आय.एम्.के.) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रवक्ते म्हणाले की, तमिळनाडूमधील बहुतेक मुसलमानबहुल भागांत अशा अनेक घटना घडत आहेत. त्या भागात रहाणार्या मुसलमानेतर लोकांवर काही प्रमाणात शुल्क आकारले जाते. रामनाथपूरम् आणि आसपासच्या मशिदींजवळ असणार्या मुसलमानेतरांच्या मालकीच्या अनेक व्यवसायिकांना मशिदींना असे शुल्क देण्याची बळजोरी केली जात आहे. आमची संघटना बर्याच काळापासून याविरोधात आवाज उठवत आहे; परंतु आम्ही अशी सूत्रे समोर आणली, तर आम्हाला धर्मांध म्हटले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात