बहिणीवर प्रेम केल्यावरून धर्मांध भावांकडून राहुल राजपूत याची हत्या केल्याचे प्रकरण
बहिणीचा पोलिसांवर आरोप
देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे हिंदु तरुणाच्या धर्मांधाकडून झालेल्या या हत्येविषयी निष्क्रीय राहिलेल्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, तसेच पोलिसांनी पुन्हा अशा प्रकारची निष्क्रीयता दाखवून नये; म्हणून सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
नवी देहली : येथे काही दिवसांपूर्वी महंमद अफ्रोज आणि महंमद राज यांनी त्यांच्या बहिणीवर प्रेम करणार्या राहुल राजपूत याची साथीदारांच्या साहाय्याने हत्या केली होती. या प्रकरणी या दोघांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ३ जण अद्याप पसार आहे. अटकेतील तिघे जण अल्पवयीन आहेत. या प्रकरणी अफ्रोजच्या बहिणीने प्रसारमाध्यामांना सांगितले आहे की, ‘मारहाणीच्या वेळी मी स्थानिक पोलीस चौकीत याविषयी माहिती दिली असता पोलिसांनी मला कोणताही प्रतिसाद दिला नाही. ‘आम्ही काही करू शकत नाही’, असे म्हणत माझ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राहुल याचा जीव वाचवता आला नाही.’ दुसरीकडे पोलिसांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी प्रसारमाध्यमांना उडवाउडवीची उत्तर दिली. या मुलीने तिला तिच्या कुटुंबियांकडून ठार मारले जाण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने तिला नारी निकेतनमध्ये ठेवण्यात आले आहे.
देहलीतील हिंदूंना ते हिंदु असल्याचे मूल्य प्राण देऊन चुकवावे लागत आहे ! – माजी आमदार कपिल मिश्रा
या घटनेविषयी भाजपचे नेते आणि माजी आमदार कपिल मिश्रा म्हणाले की, ऑक्टोबर २०१८ मध्ये ३१ वर्षांचे शिक्षक अंकित गर्ग यांची, फेब्रुवारी २०१८ मध्ये मुसलमान तरुणीशी मैत्री केल्याने तिच्या कुटुंबियांनी २३ वर्षीय अंकित सक्सेना याची, तर मुलीची छेड काढणार्या धर्मांधांचा विरोध करणारे ध्रूव त्यागी यांची हत्या करण्यात आली होती. देहलीतील हिंदूंना ते हिंदु असल्याचे मूल्य प्राण देऊन चुकवावे लागत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात