Menu Close

गोप्रेमींच्या सतर्कतेमुळे अवैध गोमांस वाहून नेणारे वाहन शासनाधीन

गोप्रेमींच्या सतर्कतेमुळे अवैध गोमांस वाहून नेणारे वाहन शासनाधीन

gohatya1मुंबई : नुकतेच देवनार गाव येथे हिंदुत्ववादी आणि गोप्रेमी श्री. मनोज वाल्मिकी यांच्या सतर्कतेमुळे अवैध गोमांस वाहून नेणारे वाहन शासनाधीन करण्यात आले आणि धर्मांध वाहनचालकाच्या विरोधात तक्रारही प्रविष्ट करण्यात आली. या वेळी गोरक्षक प्रमुख श्री. ए.पी. नाडर आणि श्री. संतोष हरी नारायण मिश्रा, बजरंग दलाचे मुंबई जिल्हा मंत्री श्री. कृष्णा बांदेकर, चेंबूर विभाग सहमंत्री श्री. लाल बहादूर यादव, श्री. रणजीत यादव, पिपल फॉर अॅ्निमल्सचे श्री. संदीप शर्मा, धर्माभिमानी श्री. गजानन परदेसी, श्री. संदीप बोरीचा, श्री. महेंद्र पवार आणि श्री. सुनील कुमार उपस्थित होते.

१. वाशीकडून अवैधरित्या गोमांस नेण्यात येणार असल्याचे वृत्त समजताच श्री. मनोज वाल्मिकी यांनी सहकारी श्री. संजय बोरीचा यांच्या समवेत एका पोलिसाला घेऊन जकात नाक्यावर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र गाडी न थांबल्याने तिचा पाठलाग करण्यात आला.

२. देवनार गावाच्या ठिकाणी वाहन पकडण्यात आले. चालक अब्दुल जमाल अब्दुल सत्तार कुरेशी (वय ४२ वर्षे) या धर्मांधाला विचारल्यावर त्याने आतमध्ये गाय आणि बैल यांचे मांस असल्याचे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *