- असंवेदनशील आणि हिंदुद्रोही पोलीस !
- काँग्रेसच्या राज्यात केवळ हिंदूच नाहीत, तर गोमाताही असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !
- अशा पोलिसांना नोकरीवरून बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात टाकायला हवे !
- अशा पोलिसांमुळेच गोरक्षकांना रस्त्यावर उतरून गोरक्षण करावे लागते. तरीही त्यांना ‘समाजकटंक’ म्हटले जाते !
भरतपूर (राजस्थान) : येथे एका स्थानिक व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरभाष करून चारचाकी गाडीतून गो तस्करी होत असल्याची माहिती दिली; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने गो तस्कर गायीला घेऊन गेल्याचे समोर आले आहे.
राजकुमार सिंह यांनी पोलिसांना दूरभाष केल्यावर ते सिंह यांची थट्टा करू लागले. या गो तस्करीचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले आहे. त्यात ३ गो तस्कर एका गायीला पकडून चारचाकी गाडीत घालत आहेत, असे दिसत आहे. ही घटना ९ ऑक्टोबरला घडली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात