भारतात देवतांची चेष्टा नव्हे, तर पूजा केली जात असल्याचे प्रतिपादन
जे एका मुसलमान अभिनेत्याला समजते, ते हिंदु अभिनेत्यांना न समजणे हे दुर्दैवी !
दिवाळीच्या काळात ज्या लक्ष्मीदेवीचे आपण भक्तीभावे पूजन करतो, त्याच देवीचा अपमान करणार्या चित्रपटाचे आतापासून होणारे उदात्तीकरण रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवावा !
मुंबई : लक्ष्मीदेवी ही धन आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहे. अभिनेते अक्षयकुमार यांनी त्यांच्या आगामी ‘लक्ष्मी बाँब’ या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मीदेवीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा. हा कॅनडा नाही, तर भारत देश आहे. (अक्षय कुमार यांनी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारलेले आहे.) इथे देवतांची पूजा केली जाते. त्यांची चेष्टा केली जात नाही, असे ट्वीट अभिनेता कमाल आर्. खान यांनी नुकतेच केले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अक्षय कुमार यांच्या आगामी ‘लक्ष्मी बाँब’ या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी काही प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे. अभिनेता कमाल आर्. खान यांनीही प्रक्षकांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
‘लक्ष्मी बाँब’ हा चित्रपट ‘कंचना’ या तमिळ चित्रपटावरून बनवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हा एक भयपट आणि विनोदी चित्रपट आहे. त्या चित्रपटात एका भुताने अभिनेते अक्षयकुमार यांच्या शरिराचे नियंत्रण मिळवलेले असते. हा चित्रपट ९ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात