Menu Close

मुसलमानाशी विवाह करणार्‍या हिंदु महिलेचा सासरच्यांनी छळ केल्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न

धर्मांतर करून मुसलमान तरुणाशी विवाह करणार्‍या महिलेचा सासरच्या कुटुंबियांनी छळ केल्याने उत्तरप्रदेश विधानसभेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न

अशा प्रकारच्या विवाहाचा परिणाम काय होतो, त्याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्यात धर्माभिमान नाही आणि त्यामुळे त्या अशा प्रकारे बळी पडतात !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : येथील राज्याच्या विधानसभेसमोर एका महिलेने स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेतले. या वेळी येथे उपस्थित असलेल्या पोलिसांना तात्काळ आग विझवून तिला रुग्णालयात भरती केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. या महिलेने धर्मांतर करून आसिफ नावाच्या तरुणाशी विवाह केला होता. विवाहानंतर तो सौदी अरेबियामध्ये गेला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांकडून पीडितेचा छळ करण्यात येत असल्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले.

 पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

या महिलेने आरोप केला आहे की, महराजगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली असता त्यांनी माझे काहीही ऐकून घेतले नाही. यामुळे मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तेही शक्य झाले नाही. त्यामुळे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *