‘लव्ह जिहादी’ विज्ञापन मागे घेतांना ‘तनिष्क ज्वेलरी’कडून निवेदन प्रसारित करून हिंदूंना अप्रत्यक्ष हिंसाचारी दाखवण्याचा प्रयत्न
हिंदूंनी त्यांचा धर्म, देवता, धार्मिक स्थळे, श्रद्धास्थाने यांचा अवमान किंवा त्यांच्यावर आक्रमण झाल्यावर आतापर्यंत कधीही कायदा हातात घेतलेला नाही. तरीही ‘हिंदू हिंसाचार करतील’, असे दाखवण्याच्या ‘तनिष्क’च्या या प्रयत्नालाही हिंदूंनी वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !
नवी देहली : ‘टाटा ग्रुप’च्या मालकीच्या असलेल्या ‘तनिष्क ज्वेलरी’ ब्रँडच्या विज्ञापनामध्ये ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यास हिंदूंना मोठ्या प्रमाणात संघटित होऊन विरोध केल्यावर हे विज्ञापन तनिष्कने हिंदूंची क्षमा न मागता मागे घेतले आहे. त्यासमवेत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे हिंदूंना हिंसाचारी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या निवेदनात म्हटले आहे, ‘आमच्या विज्ञापनाचा उद्देश सध्याच्या आव्हानात्मक काळात एकता दाखवण्याचा होता; मात्र या उद्देशाच्या उलट आम्हाला प्रतिक्रिया मिळाली, त्यामुळे आम्ही निराश आहोत.’ या निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे की, ‘आमचे कर्मचारी, अधिकारी आणि भागीदार यांच्या सुरक्षेसाठी हे विज्ञापन आम्ही मागे घेत आहोत.’
या संपूर्ण निवेदनात तनिष्कने कुठेही ‘आमचे विज्ञापन चुकीचे होते’ किंवा ‘आम्ही हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे आम्ही त्यांची क्षमा मागतो’, असे म्हटलेले नाही. उलट हिंदूंना असहिष्णु ठरवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला आहे.
तनिष्कला मोठा आर्थिक फटका
हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करण्याचे चालूच ठेवण्याचे ठरवल्यामुळे असा फटका आता त्याला कायमस्वरूपी बसणार आहे, असेच यावरून म्हणावे लागेल !
‘लव्ह जिहादी’ विज्ञापनाला हिंदूंनी केलेल्या विरोधाचा परिणाम तनिष्कच्या शेअर्सवरही झाला असल्याचे दिसून आले आहे. तनिष्कचे शेअर्स २.५८ टक्क्यांनी घसरल्याने त्यांची २ सहस्र ७०० कोटी रुपयांची हानी झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात