मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदीमुळे ६ मासांपासून बंद ठेवण्यात आलेली मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी १३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे कुलाबा (दक्षिण मुंबई)चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विशाल पटणी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर आणि श्री. भरत कडुकर हे उपस्थित होते.
दळणवळण बंदीच्या कालावधीत हिंदूंनी सामाजिक भान ठेवत मंदिरांतील धार्मिक कार्य थांबवून प्रशासनाला सहकार्य केले. दळणवळण बंदी उठवण्याचे म्हणजेच ‘अनलॉक’चे पाच टप्पे झाले आहेत. आता हिंदु समाज मंदिरे उघडण्याच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. हिंदु समाजाला देवदर्शन आणि धार्मिक कृत्ये यांतून आत्मबळ, तसेच मानसिक अन् आध्यात्मिक ऊर्जा मिळण्यासाठी मंदिरे लवकरात लवकर उघडण्यात यावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.