‘टाटा ग्रुप’च्या आस्थापनाकडून पुन्हा हिंदुद्वेष
- हिंदु तरुण ख्रिस्ती तरुणीशी ख्रिस्ती पद्धतीने विवाह करत असल्याचे दृश्य !
- ‘टाटा ग्रुप’कडून सातत्याने हिंदूद्वेष केला जात आहे, हे पहाता आता टाटा आस्थापनावरच हिंदूंनी बहिष्कार घालावा, असे वाटू लागल्यास आश्चर्य वाटू नये ! याविषयी आता रतन टाटा यांनी हिंदूंसमोर येऊन हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे, तसेच अशी विज्ञापने करण्यामागे त्यांच्या आस्थापनात कोणते हिंदुद्वेषी अधिकारी आहेत, याचा शोध घेऊन त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
मुंबई : ‘टाटा ग्रुप’च्या ‘तनिष्क ज्वेलरी’च्या विज्ञापनातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याच्या घटनेनंतर आता त्यांच्याच ‘टाटा क्लिक’ (Tata Cliq) या आस्थापनाच्या विज्ञापनातून योगासनांचा अवमान करण्यात आला आहे. या विज्ञापनात हिंदु तरुणाचे एका ख्रिस्ती तरुणीशी खिस्ती पद्धतीने ‘ऑनलाईन’ विवाह करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘टाटा क्लिक’ हे ‘टाटा ग्रुप’ची ऑनलाईन साहित्य विक्री करणारे आस्थापन आहे.
१. या विज्ञापनातील एका प्रसंगामध्ये आई आणि मुलगा दाखवण्यात आला आहे. त्या दोघांना भेट मिळालेली असून ते त्यांची अदलाबदली करतात. मुलगा त्याला मिळालेल्या भेटीचा खोका उघडतो. त्यात योगासन आणि ध्यान करतांना बसण्यासाठी घेतात ते ‘मॅट’ असल्याचे दाखवण्यात आले आहे. या ‘मॅट’वर तो बसून ध्यान लावतो. तेव्हा तेथे ‘बोरिंग’ म्हणजे ‘कंटाळवाणे’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच योगासने ही जुनीपुरानी असून ते करण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे.
२. दुसर्या प्रसंगामध्ये हिंदु तरुण आणि ख्रिस्ती तरुणी दाखवण्यात आले आहेत. यात ते ‘ऑनलाईन’ एका पाद्रयाच्या उपस्थितीत बोटात अंगठी घालून ख्रिस्ती पद्धतीने विवाह करत आहेत, असे दाखवण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात