मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करण्यासाठी ट्विटरवरून हिंदूंची मागणी
‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा हटवण्याची मागणी
- हिंदूंच्याच देशात हिंदूंच्या मंदिरांना धर्मांधांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी अशी मागणी करावी लागते, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !
- केंद्रातील भाजप सरकारने आतापर्यंतचा अशा प्रकारचा हिंदुविरोधी इतिहास पालटण्यासाठी कृती केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
मुंबई : मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणी दिवाणी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता जिल्हा न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेतून ‘ही भूमी भगवान श्रीकृष्णाची म्हणजे हिंदूंची असून ती त्यांना परत देण्यात यावी आणि येथील इदगाह मशीद हटवण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. याच अनुषंगाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा हटवण्याच्या मागणीसाठी हिंदूंकडून ट्विटरवर #Reclaim_KrishnaJanmabhoomi असा ‘हॅशटॅग’ ट्रेंड करण्यात आला आणि काही वेळातच हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर पोचला. यावर सायंकाळी ५.१५ पर्यंत १२ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट्स केल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात