Menu Close

फ्रान्स : शाळेत महंमद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे दाखवणार्‍या शिक्षकाचा १८ वर्षीय धर्मांध विद्यार्थ्याकडून शिरच्छेद

  • पोलिसांकडून धर्मांध ठार

  • हे ‘आतंकवादी आक्रमण’ असल्याचा फ्रान्सचा दावा

  • स्वतःच्या धार्मिक श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर धर्मांध त्याला ठार करतात; मात्र स्वतः अन्य धर्मियांची मंदिरे आणि मूर्ती यांची तोडफोड करतात, धर्मग्रंध जाळतात,तसेच त्यांच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे करतात, हे लक्षात घ्या !
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंचा धर्म, देवता, धर्मग्रंथ यांचा अवमान करणार्‍यांची बाजू घेणारे तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी धर्मांधांच्या हिंसाचारावर मात्र मौन बाळगतात !

पॅरिस (फ्रान्स) : इतिहास विषयाच्या शिक्षकाने वर्गात अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी सांगतांना ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेली प्रेषित महंमद पैंगबर यांच्यावरील व्यंगचित्रे दाखवली; म्हणून एका १८ वर्षीय धर्मांध विद्यार्थ्याने त्या शिक्षकाचा शिरच्छेद केला. पोलिसांनी धर्मांध विद्यार्थ्याला अटक करण्याचा प्रयत्न करताच त्याने पोलिसांवरच आक्रमण केले. तेव्हा फ्रेंच पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या पश्‍चिम उपनगर कन्फ्लान्स सेंट-होनोरीन येथील शाळेजवळ १६ ऑक्टोबरला सायंकाळी ही घटना घडली.

१. पोलिसांनी आक्रमणकर्त्याची ओळख उघड केली नसली, तरी त्याचे वय १८ वर्षे असून तो इस्लामी आतंकवादी असल्याचा संशय आहे. त्याचा जन्म मॉस्को येथील चेचन्य मुसलमान वंशातील आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह ४ जणांना अटक केली आहे.

२. ४७ वर्षीय शिक्षक सॅम्युअल हे वर्गात अभिव्यक्तीचा विषय शिकवत असतांना त्या वेळी केवळ १२ ते १४ विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी महंमद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे दाखवल्याने काही विद्यार्थी अप्रसन्न झाले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली; मात्र त्यातील १८ वर्षीय विद्यार्थ्याने सॅम्युअल यांच्यावर आक्रमण करून त्यांना ठार केले.

३. फ्रान्सच्या आतंकवादविरोधी विभागाच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, आम्ही या घटनेचे ‘आतंकवादी संघटनेशी संबंधित हत्या’ या दृष्टीने अन्वेषण करत आहोत. शाळेजवळ एका संशयास्पद व्यक्तीच्या हालचालीविषयी दूरभाष आल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तेथे त्यांना शिक्षक मृतावस्थेत आढळला आणि पोलिसांनी घटनास्थळाच्या जवळपास धर्मांध सशस्त्र असलेले पाहिले. पोलिसांनी त्याला अटक करण्याच्या प्रयत्नात गोळीबार केला. यात तो गंभीररित्या घायाळ झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून निषेध

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घटनेला ‘आतंकवादी आक्रमण’ असे संबोधले. एका वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार मॅक्रॉन यांनी सांगितले की, एक शिक्षक मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिकवण्याच्या उद्देशाने काम करत असतांना त्याची हत्या केली गेली. फ्रान्सच्या शिक्षणमंत्र्यांनी या घटनेला ‘फ्रान्सवरील आक्रमण’ असे संबोधले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *