- हिंदूंच्या देवतांचा निवडणुकीच्या प्रसारासाठी विडंबनात्मक वापर करण्याच्या कृत्याचा भारत सरकारने निषेध करत ते हटवण्याची मागणी केली पाहिजे ! जगात कुठेही हिंदु देवता, धर्म आदींचा अवमान होत असेल, तर प्रत्येक वेळी भारत सरकारने त्यास विरोध केला पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
- डेमोक्रटिक पक्षाच्या नेत्यांनी स्वतःच्या ख्रिस्ती धर्मातील धार्मिक चित्रांचा असा वापर करण्याचे धाडस का केले नाही ?
न्यूयॉर्क : पुढील मासात अमेरिकेत होणार्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प, तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन उमेदवार आहेत. उपाध्यक्षपदाच्या उमेदवार भारतीय वंशाच्या महिलेची कन्या कमला हॅरिस या आहेत. भारतात निवडणूक प्रसारात धर्माच्या आधारावर प्रचार करणे प्रतिबंधित आहे. तसे केल्यास निवडणूक जिंकलेल्या उमेदवाराची निवडणूक रहित होऊ शकते. अमेरिकेत मात्र निवडणूक प्रचार कुठल्याही थराला जाऊ शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे तेथील ‘ग्लोबल हिंदू नेटवर्क’ या संघटनेने श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे. त्यात श्री दुर्गादेवीच्या मुखवट्यात कमला हॅरिस यांचे छायाचित्र लावले आहे. जो बायडेन यांचा चेहरा देवीचे वाहन असलेल्या सिंहावर दाखवला आहे आणि देवी ज्या राक्षसाचा वध करते त्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपात दाखवले आहे. म्हणजे कमला हॅरिया यांना श्री दुर्गादेवी, जो बायडेन यांना सिंह आणि डोनाल्ड ट्रम्प यांना महिषासूर दाखवण्यात आले आहे.
अशारितीने निवडणुकीत हिंदु धर्माच्या देवतेचे ऐन नवरात्रीत विडंबन केल्यामुळे अमेरिकेतील हिंदू संतप्त झाले आहेत. त्यांनी निवडणूक प्रचारात असलेल्या ‘ग्लोबल हिंदू नेटवर्क’ या संघटनेला ‘ई-मेल’ आणि दूरध्वनी यांद्वारे संपर्क करून निषेध नोंदवला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात