Menu Close

आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्धात २० दिवसांत ५२ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू

बाकू (अजरबैझान) : गेल्या २० दिवसांपासून चालू असलेल्या आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्धामध्ये आतापर्यंत ५२ सहस्रांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अजरबैझानला तुर्कस्थान, पाक यांचे सैन्य आणि इस्लामिक स्टेटचे आतंकवादी यांचे साहाय्य मिळाले आहे. दुसरीकडे आर्मेनियाला आता रशिया, फ्रान्स आणि सर्बिया यांची साथ मिळाली आहे. अमेरिकेनेही साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली आहे. त्यामुळे हे युद्ध जागतिक युद्ध ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आर्मेनियाचे सैन्य सातत्याने क्षेपणास्त्रांचा मारा करत आहे. त्यांचे लक्ष्य अझरबैझान आणि तुर्कस्तान यांचे सैन्य अन् गांजा शहर आहे. सैन्यासमवेतच नागरी वसाहत असलेल्या शहरांवरही आक्रमणे होत आहेत.

अजरबैझानची हानी

आर्मेनियाने अजरबैझानचे ५०५ ड्रोन, ८६ हेलिकॉप्टर आणि ३८ लढाऊ विमाने नष्ट केली आहेत. त्या व्यतिरिक्त ५१३ विशेष सुरक्षा असलेल्या गाड्या आणि ८३ ‘रॉकेट लॉन्चर’ही उद्ध्वस्त केले आहेत. आतापर्यंत अजरबैझानचे १४ सहस्र ७०० सैनिक ठार झाले आहेत. यात तुर्कस्तानचे सैन्य आणि सीरियामधील आतंकवादी यांचाही समावेश आहे.

आर्मेनियाची हानी

तुर्कस्तान आणि अजरबैझान या दोन्ही देशांच्या सैन्याने मिळून आर्मेनियाचे आतापर्यंत १ सहस्र ८० रणगाडे उद्ध्वस्त केले आहेत. ७८९ ‘आर्टिलरी’ आणि ५८९ विशेष सुरक्षा असलेल्या गाड्यादेखील नष्ट केल्या आहेत. ९६ एअर ‘डिफेन्स सिस्टीम’ निकामी केल्या आहेत. ७१५ ‘ड्रोन’ पाडण्यात आले आहेत. ९२ हेलिकॉप्टर नष्ट केले आहेत. आतापर्यंत आर्मेनियाचे १७ सहस्र ८०० सैनिक ठार झाले आहेत, तर १० सहस्र नागरिकही यात बळी पडले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *